आगामी बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर मदत केली जाईल – रामदास आठवले

रामदास आठवले

पुणे – पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला आज अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोहून अधिक अनुयायी येतात. पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातूनच अभिवादन करण्याचे अनुयायांना राज्य सरकारने आवाहन केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोरेगाव-भीमाला गेले होते यावेळी त्यांनी शौर्यदिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन केलं आहे. यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील विजय स्तंभाला अभिवादन केलं.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था बदलण्यासाठी कोणताही प्लॅन नाही, फक्त आदेश काढण्याचे काम सरकार करत असल्याचे म्हणत आंबेडकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.आतापर्यंत मुंबई लोकल सुरू व्हायला हवी होती. दोन्ही सरकारकडे निर्णयक्षमता नसल्याचेही ते म्हणाले.

याबाबत आठवले यांनी पलटवार केला. ते म्हणाले, राज्याकडे कोणताही प्लॅन नाही, हे मला माहिती आहे. मात्र, अर्थव्यवस्था पट्रीवर आणण्यासाठी केंद्र सरकारकडे ठोस योजना आहे. आगामी बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर मदत केली जाईल.

महत्वाच्या बातम्या –