चांगली बातमी – ‘या’ जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट!

कोरोना

पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात येत होती. दरम्यान, शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम आता दिसू लागला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात नव्याने १ हजार १६५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात ५ हजारांपार असलेली पुणे शहराची संख्या आता मोठ्या प्रमाणात घटली आहे.

तर, ४ हजार १० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत आहे. शहरात आज दिवसभरात ११ हजार ४९९ नमुने घेण्यात आले आहेत. ५१ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती महापौर मोहोळ यांनी दिली आहे.

४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण –

४५ वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या (११ मे) ५० केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात ४० केंद्रांवर कोविशील्ड तर १० केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध असेल. कोवॅक्सिन उपलब्ध असणाऱ्या १० केंद्रांवर १३ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस दिला जाईल. तर, कोविशील्ड उपलब्ध असणाऱ्या केंद्रांवर २७ मार्च २०२१ पूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य असेल. तसेच अपॉइंटमेंटनुसार येणाऱ्या २० टक्के नागरिकांना पहिला डोस दिला जाणार आहे, असं देखील मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या –