चांगली बातमी – भारतात २५ दिवसांनंतर कोरोनाचे नवे रुग्ण तीन लाखांपेक्षाही कमी

कोरोना

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सतत वाढत असलेल्या रुग्णांबाबत रविवारी मोठा दिलासा मिळत असल्याचे दिसले. २५ दिवसांत प्रथमच ३ लाखांपेक्षा कमी म्हणजे २ लाख ८१ हजार ६८४ नवे रुग्ण आढळले. त्याआधी २१ एप्रिलला ३,१५,७५२ रुग्ण आढळले होते आणि त्यानंतर त्यात सतत वाढ होत होती. एक दिवस आधी शनिवारीही ३,११,१७० नवे रुग्ण आढळले होते. ४ मे रोजी ४,१४,२८० नवे रुग्ण आढळले होते, ते कोरोना काळातील एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण होते.

नव्या रुग्णांत घट होण्याचा हा ट्रेंड कायम राहिला तर या महिनाअखेरपर्यंत रोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या १ लाखापर्यंत राहू शकते. दिलासा देणारी दुसरी बातमी म्हणजे रविवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त राहिली. दोन्ही आकड्यांतील फरक वाढून ९६,५१५ झाला. तथापि, मृत्यूंमधील वाढ हे चिंतेचे कारण कायम आहे. रविवारी देशात ४,०९२ मृत्यू झाले.

या महिन्याच्या सुरुवातीच्या १५ दिवसांपैकी सहा दिवस ४,००० पेक्षा जास्त मृत्यू झाले. रविवारी महाराष्ट्रात ३४,३८९ नवे रुग्ण आढळले, तर ठीक झालेल्यांची संख्या ५९,३१८ होती. कर्नाटकात ३१,५३१ नवे रुग्ण आढळले, तर ३६,४७५ बरे झाले. १६ राज्यांमध्येही नव्या रुग्णांत घट होण्याचा ट्रेंड कायम राहिला.

महत्वाच्या बातम्या –