चांगली बातमी – सलग दहाव्या दिवशी देशातील नवीन रूग्णसंख्या ३ लाखांहून कमी

कोरोना

दिल्ली – मागील काही दिवसांपासून देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० प्रमाणे याही वर्षी देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.

परंतु महिन्याभरापासून देशभरात लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे सध्या रोजची वाढणारी रुग्णसंख्या काही अंशाने कमी झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आज देशात सलग दहाव्या दिवशी दैनंदिन नवीन रूग्णसंख्या 3 लाखांहून कमी झाल्याची नोंद झाली आहे. काल दिवसभरात देशात 2 लाख 08 हजार 921 दैनंदिन नवीन रूग्णांची नोंद केली गेली.

तर सक्रीय रूग्णांची एकूण संख्या देखील कमी होऊन आता 24 लाख 95 हजार 591 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्या 91,191 इतकी घटली आहे. गेल्या 24 तासांत 2,95,955 रुग्ण कोविडमुक्त झाल्याची नोंद केली गेली. रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आणखी वाढून 89 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत 22 लाख 17 हजार 320 चाचण्या करण्यात आल्या असून एकाच दिवसात करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या या सर्वाधिक चाचण्या आहेत, लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत देशभरात राबविल्या जाणाऱ्या कोविड -19 लसींच्या एकूण मात्रांनी 20 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

महत्वाच्या बातम्या –