चांगली बातमी – राज्यात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

मुंबई – राज्यात काल ८,४१८ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. तर काल राज्यात १०,५४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५८,७२,२६८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०६ % एवढे झाले आहे.

राज्यात काल १७१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२९,०८,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,१३,३३५ (१४.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३८,८३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, सध्या देशात 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाला सुरुवात होणार झाली आहे. या मोहिमेला नागरिकांकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी व तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारने प्रति महिना किमान 3 कोटी लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत, असा ठराव आज विधानपरिषद व विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा ठराव मांडला आहे.

महत्वाच्या बातम्या –