चांगली बातमी – तब्ब्ल ३ महिन्यांनी ‘या’ जिल्ह्याची रुग्णसंख्या शंभरच्या आत

कोरोना

जालना: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या व त्यातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली असून गुरुवारी नवे ८५ रुग्ण आढळले. कोरोनावर मात केलेल्या १७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, यामुळे जालनेकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, यामुळे धोका कायम आहे.

जालना शहर १५, बाजी उम्रद १, मालेगाव १, हातडी १, वंजार उमरद १, मोतीगव्‍हाण १, अरडा १, केदारवाकडी १, परतूर शहर ३, पाडळी १, सोईंजना १, आष्‍टी १, घनसांवगी शहर २, राणी उंचेगाव २, अंतरवाली दाई २, पानेवाडी १, भणंग जळगाव २, लिंबी १, पिंपरखेड १, तीर्थपुरी १, वडी रामसगाव १, भायगव्‍हाण १, पिंपरी १, राणी उंचेगाव २, अंबड शहर ५ , शहापूर १, भालगाव १, पिंपळगाव १, नागजरी १, शहागड व इतर गावांतून अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे ५४ तर अँटिजनमधून ३१ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ९२ हजार ७१० नमुन्यांची तपासणी करण्यात आली, यापैकी ५९ हजार ८१९ नमुने पॉझिटिव्ह तर ३ लाख ३० हजार ३४० निगेटिव्ह आले. तसेच २ हजार २१९ नमुने प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत. आतापर्यंत ५५ हजार ४१८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले असून एक हजार रुग्णांचा मृत्यू झाला. तर अॅक्टिव्ह ३ हजार ४०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ३३० रुग्णांना संस्थात्मक अलगीकरणात पाठवण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –