चांगली बातमी – राज्यात गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांचा आकडा अधिक

कोरोना

मुंबई – राज्यासाठी कोरोना काळातील सर्वात दिलासादायक बातमी समोर येत आहे. एकीकडे तिसऱ्या लाटेचा धोका आहे असं सांगितलं जात असताना आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या बऱ्यापैकी घटताना दिसत आहे. तर गेल्या महिन्यात पुन्हा एकदा कोरोग्रस्तांची उच्चांक गाठला होता. मात्र आता ही आकडेवारी कमी होत असल्याचं दिसत आहे.

राज्यात गेल्या २४ तासात 7510 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यातील एकूण आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 60, 00, 911 आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हि माहिती दिली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ % एवढे झाले आहे. गेल्या २४ तासात राज्यात ६,९१० नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात गेल्या २४ तासात १४७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५८,४६,१६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२९,५९६ (१३.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६०,३५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,९७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने गेल्या २४ तासात पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला. काल दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत 4 कोटी 24 हजार 701 लसींचे डोस देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –