चांगली बातमी – देशात ‘या’ तारखेला होणार मॉन्सूनचे आगमन

पावसाची शक्यता

पुणे : मे महिन्याच्या मध्याला नेहमीच सर्वांचे लक्ष मॉन्सून कधी येणार याकडे लागले असते. हवामान विभागाने एक सुखद वार्ता आज दिली आहे. केरळमध्ये ३१ मे रोजी मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचे जाहीर केले आहे. मॉन्सूनच्या आगमनात चार दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या वर्षी देशभरात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केले आहे.

साधारणपणे मॉन्सूनचे आगमन १ जून रोजी केरळमध्ये होत असते.गेल्या वर्षी २०२० मध्ये हवामान विभागाने १ जून रोजी मॉन्सून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.प्रत्यक्षात त्याचे ५ जून रोजी आगमन झाले होते. हवामान विभागाकडून दरवर्षी १५ मे रोजी मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाविषयीचा अंदाज जाहीर करण्यात येतो. यंदा तो १४ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात सर्वसाधारणपणे २० मेच्या आसपास मॉन्सूनचे आगमन होत असते. यंदा दक्षिण अंदमान समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात मॉन्सून२१ मेपर्यंत आगमन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंदमान समुद्रात २२ मे रोजी मॉन्सून स्थिरावेल. सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळ आले असल्याने मॉन्सूनच्या आगमनाला बळकटी येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –