चांगली बातमी – राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत घट तर कोरोनामुक्तांमध्ये वाढ

कोरोना

मुंबई – राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान, आता राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. रुग्ण संख्येत घट होत असून कोरोनामुक्तांचा आकडा वाढत आहे. राज्यात आज ४८ हजार ६२१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ५० ते ६० हजारांवर असलेल्या हा आकडा ५० हजारांच्या आत आला आहे. तर, ५९ हजार ५०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, दिवसभरात ५६७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये नव्या कोरोना बाधितांची संख्या घटत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. महत्वाचं म्हणजे २७ एप्रिल २०२१ पासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरता आहे. यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्तेवरील ताण कमी होण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या –