चांगली बातमी – राज्यात थंडीचा कडाका कमी होणार

थंडीचा कडाका

मुंबई –  यंदा राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली होती, डिसेंबर महिन्यात ३ ते ४ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती, तर २७ डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर या अवकाळी पाऊस आणि  गारपिटीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी (Cold) मोठ्या प्रमाणात वाढली होती.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरला होता, मात्र आता राज्यात कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुके पडत असून, काही ठिकाणी दुपारी ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे आजपासून म्हणजेच ३ जानेवारीपासून राज्यात थंडीचा  (Cold) कडाका कमी होणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. पश्‍चिमी चक्रावातामुळे उत्तरेकडील राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान होत असून, थंडीचा कडाका कमी होत आहे.

महत्वाच्या बातम्या –