आनंदाची बातमी – आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार २००० रुपये

पीएम किसान

नवी दिल्ली –  देशात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनाच्या या संकटकाळात देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत आज  रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील हप्त्याचे वितरण होणार आहे. या योजनेद्वारे 19,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वितरण होणार असून त्याचा  लाभ 9 कोटी 75 लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधितही करणार आहेत. पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 2000/- रुपये  तीन समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण 6000/-रूपये इतका निधी दिला जातो.

हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो. या योजनेद्वारे  शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 1.38 लाख कोटी इतका सन्मान निधी हस्तांतरित करण्यात आली आहे. केंद्रीय कृषीमंत्रीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.