चांगली बातमी – राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून होणार सुरु

शाळा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून आता ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे पालन करुन शाळा सुरु होणार आहेत. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ‘ ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु होणार आहेत. पण शाळांमध्ये येण्यासाठी पालकांची संमती असणं आवश्यक असणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना अटेडन्सची कोणतीही सक्ती केली जाणार,’ असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या, ‘ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात ८वी ते १२ वीचे वर्ग सुरु होणार आहेत. शाळा सुरू झाल्या तरी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. याशिवाय टास्क फोर्सनं दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करण्यात येईल. प्रत्येक शाळांना आरोग्य केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही एसओपी तयार केली जाणार असून शाळांमध्ये कोणत्याही खेळांना परवानगी नसेल. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सनं दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. निवासी शाळांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे. शाळांबाबतचे सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असणार आहेत.’

महत्वाच्या बातम्या –