चांगली बातमी – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झाली मोठी घट

कोरोना

पुणे – पुणेकरांना निर्बंधांमध्ये सूट मिळण्यासह आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात नव्याने ११९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे जिल्ह्यातील एकूण संख्या आता ४ लाख ८९ हजार ०२१ इतकी झाली आहे. तर, २३६ कोरोनाबाधितांना गेल्या २४ तासात डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७८ हजार ११९ झाली आहे.

यासोबतच,  एकाच दिवसात ६ हजार ३१३ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २९ लाख ५० हजार २७६ इतकी झाली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या २ हजार ०८६ रुग्णांपैकी १९९ रुग्ण गंभीर तर ३४० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर मृतांच्या संख्येत देखील घट झाली असून पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८१६ इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –