चांगली बातमी – राज्यात गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांचा आकडा दुप्पटीहून अधिक

कोरोना

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात 6 हजार 17 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर त्याच्या दुप्पट रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासात राज्यात 13 हजार 51 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 93 हजार 401 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35 टक्के आहे.

राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या ही एक लाखाच्या खाली आली आहे. राज्यात सध्या 96 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात गेल्या २४ तासात 66 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५६,४८,८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२०,२०७ (१३.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६१,७९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,०५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी नीती आयोगानंदेखील कोरोना स्थितीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. पुढील १०० दिवस देशासाठी महत्त्वाचे असतील, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तिसऱ्या लाटेचा धोका बोलून दाखवला होता.

महत्वाच्या बातम्या –