चांगली बातमी – जिल्ह्यात बाधीतांपेक्षा कोरोना मधून मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली

कोरोना

बीड – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत होती मात्र मागच्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत घट झालेली बघायला मिळाली. बाधीतांपेक्षा कोरोना मधून मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या मुळे बीडकरांना जरा दिलासा मिळत आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांमध्ये १११२ नवे रुग्ण आढळून आले तर १२८८ जण कोरोना मधून मुक्त झाले आहेत.

शुक्रवारी २४ तासांत ११ तर जुन्या ११ अशा एकूण २२ जणांच्या मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. जिल्ह्यात १११२ नवीन रुग्ण आढळून आले तर १२८८ जणांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी ४७८३ जणांची कोरोना चाचणी केली. याचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले, यात ३६७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १११२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ११९, आष्टी १२९, बीड २३८, धारूर ६८, गेवराई १११, केज १२१, माजलगाव ९१,परळी ५४, पाटोदा ९८, शिरूर ६६, वडवणी १७ जणांचा समावेश आहे. एकूण बाधितांचा आकडा ७२ हजार ३७५ इतका झाला आहे.

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६४ हजार २९० इतकी झाली आहे. जुन्या ११ तर २४ तासांत मृत्युमुखी पडलेल्या ११ जणांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. त्यामुळे बळींचा आकडा १३४४ इतका झाला आहे. सध्या ६ हजार ७४१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जि. प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध व संचारबंदी लागू करण्यात आली आहे तसेच नागरिकांनी देखील कोरोनाचे नियम पाळत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –