पुणे – गणेशोत्सव काळात वा उत्सव संपल्यानंतर आतापर्यंत तरी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याची नोंद नसून उलट पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या घसरणीची नोंद झाली असून गेल्या २४ तासात केवळ ८६ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांमध्ये देखील घट होत असून रुग्ण संख्या अशीच कमी होत राहिल्यास व जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास पुणे कोरोनामुक्त होण्यास अधिक गती येईल.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात नव्याने ८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९९ हजार ४५९ इतकी झाली आहे. तर, शहरातील २३७ कोरोनाबाधितांना गेल्या २४ तासात डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८८ हजार ८८४ झाली आहे.
शहरात एकाच दिवसात ६ हजार ०११ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३२ लाख ९१ हजार ५६७ इतकी झाली आहे. सध्या शहरात उपचार घेणाऱ्या १ हजार ५७१ रुग्णांपैकी १७३ रुग्ण गंभीर तर २८० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर, महापालिका हद्दीत नव्याने ३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ९ हजार ००४ इतकी झाली आहे. दरम्यान, नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- राज्यातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा इशारा
- सतत थकवा जाणवण्या मागचं कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या
- काजू खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..