सरकारने तब्बल ४ कोटी ३९ लाख रेशनकार्ड रद्द केले; तुमचं नाव ‘या’ यादीत नाही ना, जाणून घ्या

दिल्ली – राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (एनएफएसए) अंतर्गत लाभार्थ्यांचे खरे लक्ष्य ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 2013 पासून सुमारे 4.39 कोटी बनावट रेशनकार्ड रद्द केले आहेत. एका निवेदनात सरकारने म्हटले आहे की रेशनकार्ड रद्द करण्याऐवजी नवीन रेशनकार्ड नियमित व हक्कदार व पात्र लाभार्थ्यांना किंवा घरांना देण्यात येत आहेत.

म्हणून रद्द केले रेशन कार्ड –

रेशन कार्ड आणि लाभार्थ्यांच्या डेटाबेसचं डिजिटायझेशन करण्यासाठी, ते आधारशी जोडण्यासाठी, अपात्र किंवा खोट्या-बनावट रेशन कार्डची ओळख करण्यासाठी, डिजिटाईज केलेला डेटाची नक्कल रोखण्यासाठी आणि दुसऱ्या ठिकाणी गेलेल्या किंवा मृत्यू झालेल्या प्रकरणांची ओळख केल्यानंतर, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारने 2013 ते 2020 या काळात देशातील जवळपास 4.39 कोटी रेशन कार्ड रद्द केले आहेत.असे सांगण्यात आले आहे.

लाभार्थ्यांची योग्य ओळख –

पात्र लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबियांना नवीन रेशन कार्ड जारी करण्याचं काम सुरू करण्यात आले आहे. कायद्यानुसार, प्रत्येत राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी परिभाषित कव्हरेजच्या संबंधित मर्यादेत हे काम सुरु केले जाणार आहे.

NFASA अंतर्गत टीपीडीएसद्वारे 81.35 कोटी लोकांना अतिशय कमी किंमतीत खाद्यान्न उपलब्ध करण्यात येत आहे. यात 2011 च्या जनगणनेनुसार, देशातील जनसंख्येच्या दोन तृतीयांश लोक आहेत. सध्या आपल्याला  देशात 80 कोटीहून अधिक लोकांना केंद्राकडून जारी अतिशय कमी 1 रुपये, दोन रुपये आणि तीन रुपये प्रति किलोग्रॅम दराने दर महिन्याला NFASA अंतर्गत खाद्यान्न उपलब्ध करून दिले जाते.

असे बनवा रेशन कार्ड

आपण राहत असलेल्या राज्यातील सर्वात जवळील सार्वजनिक सुविधा केंद्रात जाऊन आपण रेशन कार्ड मिळवू शकता ऑनलाईन रेशन कार्ड मिळविण्यासाठी सर्वप्रथम आपल्या राज्याच्या अन्न व रसद विभागाच्या पोर्टलवर जावे लागेल. यानंतर तेथून एक फॉर्म सापडेल. हा फॉर्म भरल्यानंतर ते सर्व आवश्यक कागदपत्रांसह आपल्या जवळच्या रेशन डीलर किंवा अन्न पुरवठा कार्यालय किंवा तहसिलाकडे सबमिट करा.

रेशन कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
मतदार ओळखपत्र, बँक पासबुक, कुटुंबातील सदस्यांचा फोटो, अर्जदाराचे आधार कार्ड तसेच कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड, कायमस्वरूपी राहण्याचा दाखला व उत्पन्नाचा दाखला सबमिट केलेली सर्व कागदपत्रे अन्न व रसद विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत पडताळणी केली जातात. तपासणीचा कालावधी हा पूर्ण झाल्याच्या 30 दिवसांचा आहे. जर सर्व माहिती योग्य असल्याचे आढळल्यास रेशन कार्ड दिले जाते.

महत्वाच्या बातम्या –