लातूर – जिल्ह्यात मागील तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचा विश्वास राज्याचे लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. निलंगा तालुक्यातील गौर येथे मांजरा नदीच्या पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान पाहणी वेळी ते बोलत होते.
पालकमंत्री म्हणाले की, ‘जिल्ह्यात अतिवृष्टी व मांजरा नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पीकाचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने त्यांचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल शासनास सादर करावा असे निर्देश संबंधितांना दिले आहेत. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास शासन कटीबध्द आहे.’
पीक विमा संदर्भातील ऑनलाईन/ऑफ लाईन पध्दतीने गाव पातळीवर अर्ज स्वीकारावे अशा सुचना यावेळी त्यांनी प्रशासनास दिल्या. पालकमंत्री देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील गौर, मसलगा व ढोबळेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतात जावून पीक नुकसानीची पाहणी करुन गावातील शेतकरी ग्रामस्थांशी आस्थेवाईकपणे चर्चा केली. त्यांच्या सूचना व मागण्याचे तात्काळ निराकरण करण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी संबंधीत विभागाचे अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या –
- नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘या’ भागाचा लवकरच करणार दौरा
- नदीकाठच्या गावातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
- राज्यात सर्वांना एकाच निकषावर एकसमान मदत करणार; कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल – छगन भुजबळ
- महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करा – उद्धव ठाकरे
- खुशखबर! ‘या’ बँकेत तब्बल २५०० तरूणांना मिळणार रोजगार