ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरकारने लवकरात लवकर मदत करावी

शेतकरी

अहमदनगर – यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, अशा गंभीर संकटात शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत तातडीने उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने पंचनाम्यांचा फोर्स टाळून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व सर्व शेतकऱ्यांना सरसकट तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करुन ती शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी, अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली.

नगर तालुक्यातील अरणगाव, कामरगाव, वडगाव गुप्ता, बुरुडगाव, भोयरे पठार, पिंपळगाव कौडा, नागापूर, बोल्हेगाव येथील शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या खेळते भांडवलाच्या एकूण 16 कोटी 34 लाख रुपयांच्या धनादेशांचे वाटप माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कर्डिले पुढे म्हणाले की, खरीप हंगामातील संकटातून शेतकरी सावरत असतानाच आता रब्बीची पेरणीही अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. राज्यातील शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे भीषण चित्र पाहिले तर सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी १५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करुन जिल्हा बॅंकांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीबरोबरच त्यांच्या मुलांना स्वयंरोजगार, पशुपालन, कुक्कुटपालन व इतर व्यवसायासाठी देखील अर्थपुरवठा करण्याचा विषय विचाराधीन असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.

यावेळी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, रेवणनाथ चोभे, शिवाजी कार्ले, संतोष कुलट, सुरेश सुंबे, दिलीप भालसिंग, बाबासाहेब जाधव, विजय शेवाळे, जालिंदर कदम, दत्ता सप्रे, मनोज कोकाटे, पोपट पुंड, आनंदराव शेळके, गंगाधर शिंदे, बापू कुलट, खंडू काळे, नवनाथ वाघ, बाळासाहेब पोटघण, शरद दळवी, वर्षा जाधव, मोहन गहिले, शामराव पिंपळे, जालिंदर डोंगरे, मीनाबाई गव्हाणे, वसंत ठोकळ, कमलाकर पवार, बाबासाहेब भोर, रावसाहेब साठे, गणेश साठे, विमल कातोरे, तुकाराम कातोरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –