मजुरांच्या बँक खात्यात सरकार टाकणार दोन हजार रुपये; अशी करा नोंदणी

मजुर

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले आहे.त्यामुळे संपूर्ण जग हैरान झाले आहे. त्यासोबतच भारतामध्येही या व्हायरसने कहर माजवला आहे. यामुळे भारताचीच काय तर संपूर्ण जगाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. तसेच हा व्हायरस खूप पसरू नये म्हणून सरकारने देशात लॉकडाऊन लागू केला. परंतु या लॉकडाऊनने तर खूप जणांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

शेतकऱ्यांनी केली तक्रार ; बायोमेट्रिक अंगठे न आल्यामुळे कर्जमाफीपासून वंचित

तसेच वेगवेगळ्या राज्यातुन लोक पोट भरण्यासाठी आलेले असतात. त्यामध्ये तर काही जणांचे हातावर पोट असते. दररोज कमवून खाणाऱ्यांची संख्या देखील खूप जास्त आहे. त्यामुळे या लोकडाऊन दरम्यान सर्वांचेच हाल होत आहेत. मजदूर आपली रोजंदारी गमावून परत आपल्या मायदेशी परतले आहेत.

योजना देणारे बनु नका तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना पिका बाबत ज्ञान देणारे बना

त्यामुळे अशा मजदुरासांठी सरकारने एक चांगली बातमी दिली आहे. आता या सर्व मजदुरांच्या बँक खात्यात सरकार दोन हजार रुपये टाकू शकते. पण त्यासाठी त्या मजदुरांना पीएम किसान योजनेतून आपल्या नावाची नोंदणी करावी लागेल. याविषयीची माहिती केंद्रीय कृषी मंत्री राज्य मंत्री कैलाश चौधरी यांनी एका माध्यमाच्या मुलाखतीत दिली.

कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणासाठी विभागीय उपायुक्त यांना निवेदन

पण मात्र यामध्ये शहरातून गावात आलेल्यांना ही याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी शेत जमिनीविषयीचा पुरावा असावा. यासह पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते नंबर आणि आधार नंबर द्यावा लागेल.  येथे नोंदणी आपण घरी बसूनही करू शकतात. यासाठी आपण दिलेल्या संकेतस्थळावर जावे.  https://pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx यावर क्लिक करुन आपण अर्ज करु शकता.

महत्वाच्या बातम्या –

औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विक्री करू नये – अन्न व औषध विभाग

७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख रुपये जमा – दिलीप वळसे- पाटील