‘ई-कॉमर्स’ कडे शेतकऱ्यांचा वाढता कल

पुणे:- बी-बियाणे, खते, फवारणी यंत्रे, टार्पोलिन, छोटे पंप, अवजारे अशा विविध वस्तू शेतकरी आता ‘ई-कॉमर्स’च्या माध्यमातून मागवत आहे. राज्यात ठिकठिकाणी पोस्टमन हे साहित्य पोहोचवत आहेत. शेती साहित्याची विक्री करणाऱ्या आणि पुण्यात साठवणगृहे असलेल्या चार कंपन्या टपाल खात्याच्या गेल्या दोन वर्षांपासून हा कल वाढता असून टपाल खात्याकडे येणारी मागणी दरवर्षी २० ते २५ टक्क्य़ांनी वाढते आहे.

‘पुणे शहरात कृषी साहित्य विक्रीतील काही कंपन्यांची साठवणगृहे आहेत. महिन्यात साधारणत: १५ हजार व्यवहार या माध्यमातून होतात. गेल्या वर्षी जवळपास दहा कोटी रुपयांचे कृषी साहित्य टपाल खात्याने पोहोचवले. असे पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी सांगितले. याबरोबरच विविध प्रकारची ‘पार्सल’ पोहोचवण्यासाठीही टपाल खात्याकडे येणारी मागणी मोठी आहे. गेल्या वर्षी ‘पार्सल’ची मागणी आधीच्या तुलनेत दोनशे टक्क्य़ांनी वाढली आहे.

टपाल खात्याची पहिली ‘पेमेंट बँक’ लवकरच पुण्यात

टपाल खात्याकडून चालविन्यात येणारी पहिली ‘पेमेंट बँक’ लकरच पुणे सिटी पोस्ट कार्यालयात सुरू होणार आहे. कर्ज प्रकरण व मुदत ठेवी वगळता इतर बँकांप्रमाणेचही व्यवस्था देखील काम करणार आहे. या बँकेच्या माध्यमातून नागरिकांना आल्पदरात सोयी उपलब्ध करून देण्याचा आराखडा आखला आहे. असे पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेेश्वरकर यांनी सांगितले.