‘हा’ साखर कारखाना 27 ऑक्टोबरपासून सुरु होणार

साखर कारखाना

 उत्तर प्रदेश – जिल्हा प्रशासनाने साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरु करण्याबाबत बैठकीमध्ये, अधिकारी आणि शेतकरी संघटनांबरोबर चर्चा केली. बैठक़ीमध्ये निर्णय घेण्यात आला की, 27 ऑक्टोबर पासून मोरना कारखाना गाळप सुरु करण्यात येईल. पाच साखर कारखान्यांनी 31 पर्यंत गाळप सुरु करण्यात येईल असे त्यांनी संगितले, तीन साखर कारखान्यांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाळप सुरु करण्यात येईल. प्रशासनाकडून एडीएम प्रशासन अमित सिंह आणि सिटी मॅजिस्ट्रेट, शेतकरी संघटनेकडून राकेश टिकैत आणि धमेंद्र मलिक उपस्थित होते.

जिल्हा ऊस अधिक़ारी कार्यालयात झालेल्या बैठक़ीत भाकियू प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले की, सर्व साखर कारखाने या महिन्यात पर्यंत सुरु करणे आवश्यक आहेत आणि गाळप सुरु करण्यापूर्वी शेतकर्‍यांचे देय भागवणे आवश्यक असल्याचं सांगितलं. धमेंद्र मलिक यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना सणासाठी पैसे लागत आहे. निर्णय झाला की, मोरना साखर कारखाना 27 ऑक्टोबर पासून गाळप सुरु करण्यात येईल. खतौली कारखाना 28 ऑक्टोबर ला, टिकौला आणि मंसूरपूर 29 ऑक्टोबर आणि भैंसाना साखर कारखाना 31 ऑक्टोबर पासून सुरु होईल. रोहाना, तितावी आणि खाईखेडी या तीन कारखान्यांनी पाच नोव्हेंबर पासून कारखाना सुरु होईल असे सांगितले आहे.

शेतकरी नेत्यांनी याचा विरोध केला आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत कारखाना सुरु करण्यासाठी दबाव टाकला. कारखान्यांनी तयारी पूर्ण न झाल्याने असमर्थता दर्शवली आहे. कारखाना व्यवस्थापनाने थकबाकी भागवण्यात गती आणण्याचेही आश्‍वासन दिले. जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर शेतकर्‍याचे 497 करोड रुपये देय आहेत. यामध्ये सर्वात अधिक भैसाना साखर कारखान्यावर आहे. बैठकीमध्ये संपर्क मार्गांना योग्य केले जावे अशी मागणीही करण्यात आली. बैठकीमध्ये ज्येष्ठ विकास निरिक्षक संजय कुमार सिंह, विश्‍वामित्र पाठक, ब्रिजेश कुमार राय यांच्यासह सर्व ऊस समित्यांचे सचिव उपस्थित होते.

जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांपैकी केवळ टिकौला हा एकच कारखाना असा आहे, ज्याने गेल्या हंगामातील शेतकर्‍यांचे पूर्ण पैसे भागवले आहेत. साखर कारखान्यांवर शेतकर्‍यांचे जवळपास 497 करोड रुपये देण्याचे बाकी आहे. शेतकरी संघटनेने हे देय गाळपापूर्वी भागवण्याची मागणी केली आहे.

तितावी, रोहाना आणि खाईखेडी या कारखान्यांनी 31 ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरु करण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे. या साखर कारखान्यांच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांची पूर्ण तयारी झालेली नाही, यामुळे ते पाच नोंव्हेंबर लाच कारखाना सुरु करतील.

जिल्हा ऊस अधिकारी यांनी सांगितले की, ऊस विभाग याबाबत प्रयत्नशील आहेत की, जिल्ह्यातील सर्व आठ साखर कारखान्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये गाळप सुरु होईल. शेतकर्‍यांचे पैसे कारखाना सुरु होण्यापूर्वी भागवावेत यासाठी दबाव टाकला जात आहे.

महत्वाच्या बातम्या –