राज्यात गारठा कमी होणार, उन्हाचा चटका वाढणार

उन्हाचा

मुंबई –  राज्याच्या तापमानात मोठी वाढ होत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता उन्हाचा चटका  वाढला आहे, राज्यात मागील ३ ते ४ दिवसापासून मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटका वाढला आहे त्यामुळे राज्यात गारठाही कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार  उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि धुके कायम आहे. तर राज्यातील  धुळे, जळगाव, नाशिक , गोंदिया, नागपूर हे जिल्हे सोडले तर राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमानाचा पारा १० अंशांवर गेला आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

तर देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे अशी माहिती  हवामान विभागानेदिलेली आहे. तर देशातील  उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड, पश्चिमी उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये  थंडीचा जोर कायम राहणार आहे. तसेच सकाळी आणि सायंकाळी दाट धुके पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच उत्तर भारतात आज जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.