ओमिक्रॉनचा कहर! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू

अकोला : कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये आतापर्यंत 5 ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढवली आहे.

दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये (Dombivali) आलेला एक 33 वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह (Omicron positive) आढळला आहे. रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभाग, राज्य सरकार तसंच प्रशासन सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

ओमिक्रॉन संसर्गाचा जिल्ह्यात संभाव्य धोका वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशानुसार जिल्ह्यात 5 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजतापासून पुढील आदेश येईपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार टाळण्याच्या दृष्टीकोनातून अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर जमावबंदीसारखे निर्बंध लावणारा अकोला हा पहिलाच जिल्हा आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यात या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.

महत्वाच्या बातम्या –