राज्यात आज पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने रुग्ण बरे – राजेश टोपे

राजेश टोपे

राज्यात आज पुन्हा १३ हजार ४०८ एवढ्या सर्वोच्च संख्येने रुग्ण बरे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्यात आज पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. आज देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज  १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५१३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

सरकारची नवीन योजना; शेतकऱ्यास आता स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर घेता येणार

आज निदान झालेले १२,७१२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३४४ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११३२ (५०), ठाणे- २२९ (१), ठाणे मनपा-२२० (०),नवी मुंबई मनपा-४३२ (३), कल्याण डोंबिवली मनपा-३८६ (१५),उल्हासनगर मनपा-२९ (२), भिवंडी निजामपूर मनपा-२० (१), मीरा भाईंदर मनपा-१४५ (११), पालघर-२४९ (९), वसई-विरार मनपा-२१४ (४), रायगड-२२१ (३), पनवेल मनपा-१९३, नाशिक-२७२ (८), नाशिक मनपा-८१६ (१८), मालेगाव मनपा-४४ (२),अहमदनगर-३३८ (३),अहमदनगर मनपा-२९५ (३), धुळे-३७ (२), धुळे मनपा-५३ (१), जळगाव-३५३ (११), जळगाव मनपा-६३ (५), नंदूरबार-३५ (४), पुणे- ३६९ (११), पुणे मनपा-१६६५ (१९), पिंपरी चिंचवड मनपा-९४८ (११), सोलापूर-३२० (८), सोलापूर मनपा-६० (३), सातारा-२७० (८), कोल्हापूर-३९६ (१७), कोल्हापूर मनपा-२३८ (२), सांगली-८८ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-९३ (१०), सिंधुदूर्ग-३०, रत्नागिरी-८१ (२), औरंगाबाद-२१३ (२), औरंगाबाद मनपा-११६ (१), जालना-९६ (३), हिंगोली-२७ (१), परभणी-१७ (३), परभणी मनपा-३९ (४), लातूर-१६६ (१०), लातूर मनपा-७७ (६), उस्मानाबाद-१२१ (७), बीड-९४ (२), नांदेड-१०९ (५), नांदेड मनपा-२५ (५), अकोला-१३ (१), अकोला मनपा-३१ (१),अमरावती-४१ (१), अमरावती मनपा-६३ (३), यवतमाळ-१३९ (१), बुलढाणा-५४ (१), वाशिम-३७ (१), नागपूर-३१८ (५), नागपूर मनपा-४५४ (२४), वर्धा-११, भंडारा-१८ (१), गोंदिया-२७ (२), चंद्रपूर-३६, चंद्रपूर मनपा-९ (१), गडचिरोली-१३, इतर राज्य १४ (२).

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ८ हजार ८८७ नमुन्यांपैकी ५ लाख ४८ हजार ३१३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख १५ हजार ११५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ८८० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३४४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.

महत्वाच्या बातम्या –

भाजलेले चणे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार