कल्याण –केंद्र शासनाने(Central Government) बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2 टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेतला होता. हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँका यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे(Central Government)केली आहे. याबाबत नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आपली भूमिका मांडली आहे.
पीक कर्जापोटी देण्यात येणारा व्याज परतावा मिळालाच पाहिजे, त्या दृष्टीने राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे(Central Government) पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. अशी भूमिका नगर विकास मंत्री व पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. ते डोंबिवली जवळील कोळेगाव येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरनाच्या कामाच्या भूमिपूजनासाठी कोरेगाव येथे आले होते, यावेळी कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यासह अंबरनाथ मलंग गड कुशिवली येथील धरणाच्या मोबदला वितरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करत पोलिसांनी नायब तहसीलारासह २८ जणांना अटक केली आहे. कुशवली प्रकरणी काय कारवाई होणार? याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी, प्रकरण तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
- आज जमा होणार ‘ह्या’ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे !
- शेतकऱ्यांना ‘पीक कर्जाचे’ वाटाप वेळेवर करावे ; मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश !
- बंगळुरूचे शेतकरी नेते ‘राकेश टिकैत’ यांच्यावर फेकली शाई ; कार्यक्रमस्थळी
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; पगारात होणार वाढ…!
- जिल्हा परिषदेत १३,५२१ जागांसाठी भरती होण्याची शक्यता ; वाचा सविस्तर !