देशावर ‘म्युकरमायकोसीस’चे मोठे संकट; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

म्युकरमायकोसीस

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. ब्लॅक फंगस म्हणजेच म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान आज केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या जीएसटी परिषदेच्या झालेल्या बैठकीनंतर केंद्र सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. ब्लॅक फंगसवरील औषधे करातून सूट असलेल्या यादीत समाविष्ट करण्यात आली असून, आता त्यावर ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत कर आकारला जाणार नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

त्यामुळे या आजारावर उपयुक्त असलेल्या अँपोटेरिसीन बी या औषधाचा समावेश करातून सूट असलेल्या यादीत करण्यात आला आहे. तसेच कोरोनाशी निगडीत आयात करण्यात येणाऱ्या गोष्टींवरील IGST करातील सूटही वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी यावेळी दिली.

कोरोना संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जीएसटी परिषदेची बैठक झाली नव्हती. सुमारे ७ महिन्यांनंतर शुक्रवारी झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या –