सांगली – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या द्राक्ष पिकांबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या द्राक्ष पिकांचे विविध निकषानुसार पंचनामे करण्यात आले आहेत. काही द्राक्ष बागांची अद्याप फळपिक छाटणी झालेली नाही. अतिवृष्टीमुळे काही द्राक्षबागांच्या मुळांचे कार्यही थांबलेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढे घेतल्या जाणाऱ्या द्राक्ष फळपिक छाटणीनंतर नुकसान निदर्शनास येऊ शकते. याबाबत राज्यस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली द्राक्ष बागायतदार संघाच्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी तसेच द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे द्राक्ष पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर माहिती देऊन सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली. तसेच द्राक्षपिक विम्याच्या नियमावली बाबतही चर्चा करून यामध्ये बदल करणे आवश्यक असल्याबाबत मागणी केली. द्राक्ष बागायतदार संघाच्या मागण्यांबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी बैठकीतूनच भ्रमणध्वनीव्दारे कृषि आयुक्त यांच्याशीही चर्चा केली.
महत्वाच्या बातम्या –
- झोपण्यापूर्वी दुधात तूप टाकून प्या, होतील खास फायदे
- पालक खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे
- बडीशेप खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे
- लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे