मंत्र्यांच्या डोक्यात चढली सत्तेची नशा – सुप्रिया सुळे

जळगाव: मंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची नाश गेली आहे जनता याची नोंद घेऊन योग्य वेळी उत्तर नक्कीच देईल. अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.

कर्जमाफी आणि बोंडआळीच्या मदतीची चौकशी करण्यासाठी बँकांच्या चकरा मारण्याऐवजी शेतात राबा असा अजब सल्ला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. तसेच या वक्तव्याला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी देखील पाठपुरवठा केला. कापसाला भाव मागण्यापेक्षा शास्त्रोक्त शेती करुन उत्पादन दुपटीनं वाढवा असा उपदेशाचा ढोस गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी या मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, २०११ मध्ये याच साली राज्यात आघाडी सरकार असताना गिरीश महाजन यांनीच कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार दर मिळावा यासाठी अकरा दिवसांचं उपोषण केले होते. परंतु मंत्री पद मिळाल्यानंतर मात्र त्यांची भाषा बदलली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसता येत नसतील तर किमान त्यांच्या जखमांवर मीठ तरी चोळू नका. कर्जमाफी मागण्याऐवजी शेतात राबा, असा अजब सल्ला देणाऱ्या मंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची नशा चढली आहे. जनता याची नोंद घेऊन योग्य वेळी उत्तर नक्कीच देईल.