शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी मोदी सरकारने तीन नवे कृषी कायदे बनवले – राहुल गांधी

राहुल गांधी

पंजाब – मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. पंजाबामध्ये काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली खेती बचाओ यात्रा सोमवारी संगरूर जिल्ह्यात पोहोचली.

भवानीगड येथे धान्यबाजारात झालेल्या सभेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कृषि विधेयकाकरून मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात गरीब, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी एकही धोरण आणले नाही. ती सर्व धोरणे तीन ते चार निवडक मित्रांसाठी (उद्योगपती) बनवण्यात आली, असे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून लहान व्यापारी आणि छोट्या उद्योजकांना संपवले. त्याच पद्धतीने शेतकरी आणि मजुरांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी तीन नवे कृषी कायदे बनवले, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

महत्वाच्या बातम्या –