दिल्ली – राहुल गांधी यांचे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्यावर सध्या सुरु असल्याचे दिसत आहे. मंगळवारी झालेल्या अर्थसंकल्पानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी(Congress leader Rahul Gandhi) राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर बोलत असतांना म्हणाले कि ‘ भारतातील ५५ कोटी नागरिकांकडे जेवढी संपत्ती आहे. त्याहुन अधिक प्रमाणात… त्यापेक्षाही जास्त संपत्ती अंबानी व अदानी ह्यांच्याकडे आहे. देशाच्या उद्योगांमध्ये हुकूमशाही आणून सर्व अंबानी – अदानी ह्यांच्याकडे देण्याचं काम हे मोदी सरकार(Modi government) करत आहे अशी जबर टीका काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर केली.
भाजपच्या सदोष दृष्टीनं आपला देश कमकुवत झाला आहे. मी ज्या भावनेने बोलतो तो आपल्या राष्ट्राच्या स्थितीबद्दल अस्वस्थता आहे.
आपण जलद आणि निर्णायकपणे कार्य(Work fast and decisively) केले पाहिजे. २०२० मध्ये भारतातील तीन कोटी तरुणांनी(Youth) आपला रोजगार/नोकरी(Employment / Job) गमावली आहे माघील ५० वर्षातुन काढली गेलेली आकडेवारी २०२० ची आकडेवारी हि सर्वात मोठी असून हि चिंताजनक बाब असल्याचं हि ते म्हणाले.
देशात दोन भारत तयार करण्याचं काम हे मोदी सरकार करत असल्याचे दिसते एक भारत असा आहे कि तो खूप श्रीमंत आहे व दुसरा भारत हा गरीब लोकांचा आहे या दोघात दरी वाढत चालली असून भारतातील तरुण मुले हे सरकार कडे रोजगार मागत आहे पण ते देण्यासाठी हे सरकार शक्षम नसल्याचे दिसते असे काँग्रेस नेते राहुल गांधी(Congress leader Rahul Gandhi) म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात आजपासून कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भातील नवीन नियमावली लागू,
- Budget 2022 : शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं बजेट, घरं, रेल्वे, १ लाख कोटी म
- अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रु
- बांधकाम कामगारांसाठी अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी – हसन मु