बेरोजगारांसाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली –  मागच्या वर्षा पासून देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. देशात कोरोनाचं सावट आलं अन् सगळ्यांनाच याचा मोठा फटका बसला. प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठं नुकासान झालं. परिणामी अनेक मोठ्या कंपन्यांनी कामगारांना कामावरुन काढून टाकलं. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. या पार्श्वभूमीवर आता बेरोजगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ‘अटल बीमित व्याक्ती कल्याण योजनेची’ मुदत ३० जून २०२२ पर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत औद्योगिक कामगारांना बेरोजगारी भत्ता दिला जातो.

कोरोनासारख्या साथीच्या काळात नोकरी गमावलेल्या कामगारांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. अटल बिमीत कल्याण कल्याण योजनेअंतर्गत, नोकरी गमावलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता आहे, ज्याचा लाभ फक्त त्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे जे ईएसआय योजनेअंतर्गत येतात. म्हणजेच इएसआय (ESI) योगदान त्यांच्या मासिक पगारातून कापले जाते. योजनेअंतर्गत, बेरोजगार झाल्यानंतर, सरकारकडून जास्तीत जास्त 90 दिवस म्हणजे तीन महिने आर्थिक मदत दिली जाईल.

कोणत्याही कारणामुळे नोकरी गमावलेल्या विमाधारकांना ३ महिन्यांसाठी ५० टक्के पगारावर बेरोजगारी भत्ता देण्याची ही योजना आहे. विमाधारक अंतिम नियोक्ताद्वारे दावा पुढे पाठवण्याऐवजी थेट ईएसआयसी शाखा कार्यालयात दावा सादर करू शकतो आणि तो थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केला जातो. कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत दोन सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक असलेल्या ईएसआयसीच्या बोर्ड बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या –