नवी दिल्ली – कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. या तिन्ही कायदामुळे देशातील शेतकऱ्यांची वाट लागणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती टीका केली.मोदी सरकारने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांची वाट लावण्यास घेतली आहे. ते केवळ तीन कायद्यांवर थांबणार नाहीत तर शेतकऱ्यांची वाट लावूनच थांबणार आहेत.
ज्यासाठी हा देश ७० वर्षांपूर्वी लढला होता, तेच आता पुन्हा घडतंय. आत्ता तुम्हाला मी काय बोलतो ते कळणार नाही, पण जेव्हा गुलाम व्हाल, तेव्हा कळेल’, असं ते म्हणाले. संपूर्ण देशाची शेती आपल्या तीन चार मित्रांच्या हवाली करण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, संपूर्ण देश विरोधात गेला तरी मी सत्याच्या बाजून लढत राहील. मी नरेंद्र मोदी किंवा भाजपला घाबरत नाही. मी स्वच्छ चारित्र्याचा आहे. हे लोक मला हात लावू शकत नाही. गोळी घालू शकतात ही दुसरी गोष्ट आहे. पण मी देशभक्त आहे. यांच्याविरोधात उभा राहणारच, असं त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या –
- खुशखबर! मुंबई विभागीय पोस्टात भरती
- अंडी का खावीत ? जाणून घ्या फायदे
- शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी राज्याचा कृषी विभाग प्रयत्नशील – दादाजी भुसे
- राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी चार दिवस कोरोना लसीकरण