मान्सुून केरळमध्ये १ ऐवजी ३ जूनला दाखल होणार, तर राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

पाऊस

मुंबई – देशात यंदा मान्सून हा वेळेत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, यंदा मे महिन्यात एकामागे एक चक्रीवादळ देशात धडकल्यामुळे मान्सूनचं आगमन काही दिवसांनी पुढं गेलं आहे. ‘यास’ आणि तौक्ते वादळामुळे शेतीसह घरांचं देखील मोठं नुकसान झालं. आता, शेतकरी हे खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत.

अशातच पावसाचा अचूक अंदाज मिळणे हे गरजेचे असते. राज्यात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सुून केरळमध्ये 3 जूनला दाखल होईल. यामुळे मान्सून राज्यात दाखल होण्यास देखील चार ते पाच दिवसांचा विलंब होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होतंय, त्यामुळेच पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. याबाबत आयएमडीचे माजी प्रमख हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी माहिती दिली. विशेषतः कोल्हापूर, सांगली ,सातारा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडू शकतो.

महत्वाच्या बातम्या –