उद्यापासून देशातील सर्व राज्यांमध्ये दुधाचे नवे दर लागू

नवी दिल्ली – देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. देशभरात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन, कडक निर्बंध असे उपाय योजिले आहेत. त्यामुळे देशात अनेकांच्या घरात चूल पेटणे देखील मुश्कील होऊन बसले आहे. अशात देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल यांचे दर वाढले आहे. तर आता दुसरीकडे आता दुधाच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे. उद्यापासून म्हणजेच १ जुलैपासून देशातील सर्व राज्यांमध्ये दुधाचे नवे दर लागू होणर आहेत.

तर अमूलच्या सर्व उत्पादनांच्या किमतीत २ रुपयांनी वाढ होणार आहे. यामुळे आता अमूल गोल्डची किंमत तब्ब्ल ५८ रुपये प्रति लीटर होणार आहे. तसेच अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रिम यांच्या किमती लिटरमागे २ रुपयांनी वाढणार आहे.

दीड वर्षांनी अमूलकडून उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. देशात उद्यापासून दिल्ली, एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर सर्वच राज्यांमध्ये नवे दर लागू होतील.

मागील वर्षापासून कोरोनाच्या या संकटामुळे अनेकांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय ठप्प झाले आहेत. एकीकडे असे चित्र असताना सततच्या होणाऱ्या त्यात आता महागाई वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांनी कसे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल आणि आता दुधाच्या किंमतीत देखील वाढ होत आहे.

महत्वाच्या बातम्या –