राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

पाऊस

औरंगाबाद – मराठवाडा व लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाले आहे. मराठवाडा ते दक्षिण किनारपट्टीपर्यंत (अंतर्गत कर्नाटक मार्गे) उत्तर दक्षिण कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस २५ ते २७ एप्रिल या कालावधीत मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज पुणे येथील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान ४१. २ अंश सेल्सिअस एवढे चंद्रपूर येथे नोंदले गेले आहे. एकीकडे उन्हाचा पारा वाढत चालला आहे. तर दुसरीकडे पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे नागरिक डोळे लावून बसला आहे. उकाडा वाढल्यामुळे हवामानामध्ये गारवा निर्माण होऊन थोडे बरे वाटेल असा अंदाज व्यक्त करत आहेत.

दोन आठवड्यापुर्वी खुप अवकाळी पाऊसल पडला होता. त्यामुळे हवेमध्ये थोड्याफार प्रमाणात हवेमध्ये थंडावा जाणवत होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला खुप उकाडा जाणवत होता. परंतू दुसऱ्या तसेच तिसऱ्या आठव्ड्यामध्ये हवेतील गारवा या वातावरण बदलल्याचा परिणाम पहावयास मिळत आहे. आता पुन्हा अवकाळी पाऊस पडत असल्याने हवेमध्ये अधुन मधुन गारवा जाणवायला लागू लागला आहे.

महत्वाच्या बातम्या –