‘या’ जिल्ह्यामध्ये नव्याने कोरोना रुग्णवाढीपेक्षा डिस्चार्जची संख्या जास्त

कोरोना

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार घातला आहे. कालचा दिवस नगरकरांसाठी दिलासादायक असा होता. काल दिवसभरात जिल्ह्यात ४०५ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ४२८ एवढी झाली असून आत्तापर्यंत ३९ हजार ५६२ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात काल ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०५ टक्के इतके झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ७२४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून काल दिवसभरात कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही, रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचा आलेख वाढत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २०७ आणि अँटीजेन चाचणीत १९३ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ७१, अकोले ३, जामखेड २, कोपरगाव ४, नगर ग्रामीण १३, नेवासा ६, पारनेर ११, पाथर्डी ३, राहाता २३, राहुरी ३२, संगमनेर १७, शेवगाव ४, श्रीगोंदा १, श्रीरामपूर १७ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कोपरगाव २०, नगर ग्रामीण १६, नेवासा २४, पाथर्डी २४, राहाता ३६, राहुरी १९, संगमनेर ३२, श्रीगोंदा २१, कॅन्टोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –