राज्यात गेल्या २४ तासात ‘इतक्या ’नव्या कोरोना रुग्णांची वाढ

कोरोना

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. राज्यात गेल्या २४ तासात कोरोना बाधितांपेक्षा काही प्रमाणात कोरोनातून मुक्त झाल्याची संख्या जास्त आहे. तसेच राज्याच्या पॉझिटीव्हीटी दरात किंचीतशी वाढ झाली आहे. तर मृत्यू दरात ही गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात २४ तासांत कोरोनाचे ७ हजार ३०२ नवे रुग्ण आणि १२० मृत्यू यांची नोंद झाली. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ७ हजार ७५६ जण बरे झाले. आतापर्यंत राज्यात झालेल्या ४ कोटी ६२ लाख ६४ हजार ५९ कोरोना चाचण्यांपैकी ६२ लाख ४५ हजार ५७ पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर २.०८ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १३.५ टक्के, रिकव्हरी रेट ९६.३४ टक्के आहे.

कोरोनामुळे राज्यातील ५ लाख ५१ हजार ८७२ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये तर ३ हजार ७४३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ६२ लाख ४५ हजार ५७ जणांना कोरोना झाला, यापैकी ६० लाख १६ हजार ५०६ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ३१ हजार ३८ मृत्यू झाले.

राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ३ हजार ३४५ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. दरम्यान राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांचा हा आकडा आता लाखांच्या आत आला आहे. सध्या महाराष्ट्रात ९४ हजार १६८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

महत्वाच्या बातम्या –