पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. मार्च पासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख हा उतरता असल्याचं दिसून येत आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान. पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.
पुणे शहरात आज सलग आठव्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या ही एक हजाराच्या आत आहे. शहरात आज ५८८ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ९२१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता आठ हजारांच्या खाली आली आहे. सध्या ७ हजार ९९० रुग्णांवर पुण्यात उपचार सुरु आहेत. त्यापैकी ९९६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, १ हजार ८६२ रुग्ण ऑक्सिजनच्या साहाय्याने उपचार घेत आहेत. आज ३३ रुग्णांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच, अद्यापही कोरोनाच संकट हे पूर्णपणे नष्ट झालं नसल्याने काळजी व खबरदारी घेणं गरजेचं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढच्या ४८ तासांत वादळी पावसाची शक्यता
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- कोरोना संकटकाळात बचतगटांतील महिलांनी केली ६० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल – हसन मुश्रीफ
- खरीप हंगामासाठी पीक कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा – यशोमती ठाकूर
- उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज