कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रडवले; भावात २०० रुपयांची पुन्हा घसरण!

कांदा

कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना(To farmers) रडवले; भावात २०० रुपयांची पुन्हा घसरण!

पुणे (चाकण) – चाकण येथील महात्मा फुले मार्केट खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काल दिनांक ८ रोजी ३००० पिशवी कांद्यांची आवक झाली होती. त्यात कांद्याला १००० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल भाव हा भाव बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आला. १६०० रुपयांपर्यंत पोहचलेला कांद्याचा भाव आवक कमी असल्याने शेकर्यांमध्ये आणखी भाव वाढण्याची अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात २०० रुपयांनी भाव गडगडले.

निर्यातदार कंपनीचे प्रतिनिधी म्हणाले कि कांद्याच्या भावात बाहेरील परिस्तिथी कारणीभूत ठरत असून श्रीलंकेतील वातावरण तेथील परिस्थिती तसेच सौदी अरेबिया, कतार, कुवेतसह इतर आखाती देशातील भारतीय वस्तूंवर होत असणारे विपरीत परिणाम याचा फटका कांदा बाहेर निर्यात करण्याकरिता बसत आहे.
आखाती देश आणि श्रीलंका मोठया प्रमाणात कांदा ते भारताकडून खरेदी करत असतात. असे ते म्हणले

परंतु त्यांच्या येथील उध्दभवलेली परिस्थिती त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –