आमगाव येथे गुरूवार म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२० रोजी आणि शुक्रवारी म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शासकीय धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांचे धान भिजल्याने धानाला अंकुर फुटले. त्यामुळे शेतकऱ्यांवर धान परत घरी घेऊन जाण्याची वेळ आली. खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळेच शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे.
शेतकऱ्यांना अंकुरीत झालेला धान स्विकारता येणार नाही असे सांगून परतावून लावण्यात येत आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व त्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये याकरीता धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र गोरठा केंद्रावरील नियोजन शून्यतेमुळे शेतकऱ्यांचे धान पावसात भिजले. शुक्रवारी म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या पावसामुळे सुमारे सात हजार पोते धान पावसात भिजले असल्याची माहित समोर आली आहे.
नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी ९ जानेवारीला मतदान
२२ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान गोदाम फुल्ल झाल्यामुळे खरेदी बंद होती. त्यामुळे मागील एक महिन्यापासून शेतकऱ्यांचे धान परतीच्या पावसात भिजत राहिले. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या धानाला अंकुर फुटले आहे. हे अंकुरीत धान व ओले धान आम्ही घेणार नाही अशी भूमिका धान खरेदी केंद्राने घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
भंडारा जिल्ह्यातील ५७ हजार ४७६ हेक्टरवरील रबी हंगाम धोक्यात https://t.co/CdB4rmre0m
— Krushi Nama (@krushinama) February 8, 2020