ग्राम विकासाच्या नियोजित कामांना मिळणार चालना – बच्चू कडू

बच्चू कडू

अमरावती – ग्राम विकासाच्या नियोजित कामांना चालना देऊन प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नुकतेच केले .

चांदूर बाजार येथील ग्रामीण भागातील 18 कोटी  74 लक्ष 12 हजार रुपये विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.खराळा फाटा येथील जवळा-खराळा-बोराळा-बेलोरा ते रिद्धपूर-बलोरा-चिंचोलीकाळे-देऊरी-नांदगावपेठ या रस्त्याची व्दिवार्षिक देखभाल व दुरुस्ती केलेल्या कामांचे लोकार्पण राज्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या विकासकामासाठी 5 कोटी 88 लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला होता.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बेलोरा ते बेलखेडा रस्ता तयार करण्यात आला आहे. श्री . बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या हस्ते या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. या रस्त्याची लांबी तीन किलोमीटर एवढी आहे .

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मौजा बोराळा येथे अभिसरण अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले आहे. या विकास कामासाठी 23 लाख 82 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

बेसखेडा-बेलोरा या रस्त्याची सुधारणा कामे पूर्ण झाली असून यासाठी 160.45 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. हा रस्ता पूर्ण झाला असून या रस्त्याचे लोकार्पण यावेळी करण्यात आले . बेसखेडा येथे क्राँकीट रस्ता बांधकामाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.

या कामाची किंमत 12.04 लाख एवढी आहे . येथीलच रस्ता बांधकामाचे लोकार्पणही करण्यात आले असून या विकासकामासाठी 12.04 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. राज्यमंत्र्यांनी येथील कामांची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. गावामध्ये आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खराळा , खरवाडी , थुगाव , प्रिंपी थुगाव , पिंपळखुटा , टोंगलापुरा फाटा , कुरळपूर्णा, कोंडवर्धा तसेच कुर्हा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले

महत्वाच्या बातम्या –