जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता – माधवन राजीवन

माधवन राजीवन

आज (ता. २७) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता  हवामान विभागाने वर्तविली आहे. महाराष्ट्रात १९७२ नंतर उशिराने २० जून रोजी मॉन्सून पोचला. मॉन्सूनने मंगळवारी संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर बुधवारी (ता. २६) कोणतीही प्रगती केली नाही. वायव्य, तसेच उत्तर भारतातील राज्यांमध्ये १ ते ३ जुलैपर्यंत मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. यातच हवामान विभागाने ३० जून रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत दिले आहे.

मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (१ ते ६ जुलै) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी बुधवारी (ता. २६) ट्विटद्वारे दिली.

भारतीय हवामान खाते केंद्रातील पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्याच मंत्रालयाचे सचिव असलेल्या राजीवन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, यंदा देशात मॉन्सून उशिरा दाखल झाला. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून मॉन्सूनची सातत्याने प्रगती होत आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या पोषक वातारणामुळे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मॉन्सून सक्रिय होईल.

आश्वासनावर जगविणाऱ्या या सरकारला धडा शिकवणार – रविकांत तुपकर

झाडे लावणे हा स्वर्गात जाण्याचा समृद्धी मार्ग आहे – सुधीर मुनगंटीवार

 

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.