नवी दिल्ली – आज पासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केल. या दरम्यान 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाणार आहे. सत्राचे दोन भाग असतील. पहिला भाग 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आणि दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत होईल. संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समितीने (सीसीपीए) या तारखांची शिफारस केली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केल. यावेळी राष्ट्रपतींनी केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांच कौतुक केल. या कृषी सुधारणांचा लाभ 10 कोटींहून अधिक छोट्या शेतकऱ्यांना तात्काळ मिळणे सुरु छोटे छोट्या शेतकऱ्यांना होणाऱ्या लाभांना समजावून सांगताना अनेक पक्षांनी याला समर्थन देखील दिले होते असे यांनी सांगितले. सध्या या कायद्यांना स्थगित केल आहे. तीन नवीन कृषि कायदे बनवताना जुन्या व्यवस्थेनुसार ज्या सुविधा आहे. त्या कमी करण्यात आलेल्या नाही. मात्र नवीन सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
त्यांनतर अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात अर्थसंकल्पाच्या प्रस्तावांवर चर्चा होईल. या अधिवेशन सत्रादरम्यान काँग्रेससोबत १६ विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते आणि कांग्रेस चे वरिष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांनी ही माहिती दिली होती.
यावेळी कोरोना काळात अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना देखील दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेची होत असलेली पडझड लक्षात घेता यंदाचा अर्थसंकल्प यावर काय उपाययोजना आणणारा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 जाहीर
- राज्यात ७३ टक्के कोरोना लसीकरण
- मोठी बातमी – शेतकरी संघटनांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
- मोठी बातमी – ट्रॅक्टर रॅलीमुळे वाद सुरु असताना आता भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा
- शेतकऱ्यांवर मोठं संकट – राज्यातील ‘या’ भागांमध्ये उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता