राज्यात घेवड्याचे दर ५०० ते ४२०० रूपये प्रतिक्विंटल

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल म्हणजेच ३० जानेवारी रोजी घेवड्याची सुमारे ८ टेम्पो आवक झाली होती. यावेळी घेवड्याला दहा किलोला १०० ते १२० रुपये दर मिळाला. आवक सरासरीपेक्षा कमी असली, तरी मागणी नसल्याने दर कमी झाले आहे. बाजारात घेवड्याची आवक ही पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत असते. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत घेवड्याची ३० क्विंटलची आवक झाली. त्याला प्रतीक्विंटल १००० ते २००० रूपये व सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला.दर दिवसाला साधारण ३० ते ५० क्विंटल घेवड्याची आली होत असते.

कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेवड्याची आठवड्यातून दोन – तीन दिवसच आवक होत आहे. काल म्हणजेच ३० जानेवारी रोजी घेवड्याची तीन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ४२०० रुपये मिळाला. नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत घेवड्याची ६२९ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० रुपये होते.

जळगावात भरताची वांगी १६०० ते २००० रुपये

नागपूर कळमना बाजार समितीत घेवड्याची १५० ते १७० क्विंटलची आवक आहे. घेवड्याला सरासरी १००० ते १२०० रुपयांचा दर असल्याची माहिती देण्यात आली आहे. बाजारात १५ ते १८ रुपये किलोचा किरकोळ दर घेवड्याला मिळत आहे.