केंद्र सरकारनं नुकत्याच केलेल्या कृषी क्षेत्रातील सुधारणा कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढच होणार आहे – राणाजगजितसिंह पाटील

राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद – नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र आणि देशव्यापी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून रविवारी सकाळी ‘चलो दिल्ली’ आंदोलन, तर सोमवारी प्रमुख शेतकरी नेते उपोषण करणार आहेत.आम्ही सरकारशी चर्चेस तयार आहोत; मात्र आधी तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबत चर्चा होईल, असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी शनिवारी सांगितले.

दरम्यान,नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा मिळतील, नवीन पर्याय त्या माध्यमातून मिळतील. शेतकरी तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहेत. यामुळे देशात शीतगृहांच्या सोयी आधुनिक होणार आहेत. परिणामी कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक होईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कायद्यांचं पुन्हा एकदा समर्थन करत ते शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं नुकत्याच केलेल्या कृषी क्षेत्रातील सुधारणा कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढच होणार आहे. या कायद्यांबाबत पसरवले जात असलेले संभ्रम निरर्थक आहेत असं प्रतिपादन भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल उस्मानाबाद इथे पत्रकार परिषदेत केले.

शेतकरी हिताच्या नव्या कृषी कायद्यांबाबत संभ्रम पसरवला जात आहे.ज्यांना या कायद्यातील तरतुदींबाबत आक्षेप असेल त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधी कोणत्या तरतुदी आहेत ते नेमकं सांगावं असं जाहीर आवाहन त्यांनी यावेळी केलं.केंद्र सरकारने आणलेले नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना समजावेत यासाठी त्या विधेयकाचा मराठी अनुवाद लोकांपर्यत पोहोचवण्यात येणार आहे, अशी माहिती राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महत्वाच्या बातम्या –