‘हा’ कारखाना पूर्ववत सुरू न केलेल्या कंपनीवर कारवाई करून अहवाल तातडीने सादर करावा

नाना पटोले

मुंबई – अंबादेवी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या अटींवर विकला गेला आहे. मात्र, अटींची पूर्तता न केल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि बेरोजगार यांच्या समस्या वाढल्या आहेत. संबंधित कारखाना खरेदी केलेल्या कायनेटीक पेट्रोलियम कंपनीवर नियमान्वये कारवाई करण्यात यावी.  कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. संबंधित कारवाईचा अहवाल एक महिन्यात सादर करावा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आज विधानभवन येथे अमरावती अंजनगाव येथील श्री. अंबादेवी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले बोलत होते. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार बळवंत वानखेडे, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, उपसचिव संतोष घाडगे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, अंजनगाव येथील अंबादेवी सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे अटींच्या अधीन राहून तो मे. कायनेटीक पेट्रोलियम कंपनीस विकण्यात आला. मात्र, संबंधित कंपनीने अटींनुसार साखर कारखाना पूर्ववत सुरू न केल्याने शेतकरी आणि स्थानिक बेरोजगारांची समस्या निर्माण झाली आहे. अटींची पूर्तता केली नसल्याने संबंधित कंपनीवर नियमान्वये कारवाई करून अहवाल सादर करावा, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –