राज्यातील ‘या’ कारखान्याच्या विक्री व्यवहाराची ईडीकडून होणार चौकशी

साखर कारखाना

मुंबई – ईडीने काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केली होती, तर आता ईडीला नंदुरबार जिल्ह्यातील पुष्प दंतेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्यवहार संशयास्पद आढळून आले आहेत. ज्या पद्धतीने कारखान्यांची विक्री करण्यात आली ती संशयास्पद असल्याने ईडीने आपला फास आवळायला सुरुवात केली आहे.

तर राज्य सहकारी बँकेचे पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखान्यावर तब्ब्ल 36 कोटी रुपयाचे कर्ज थकीत असल्याने सहकारी बँकेने हा कारखाना लिलावात काढला होता. तो कारखाना अगोदर आस्ट्रेलिया अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खरेदी केली त्या नंतर या कंपनीने आयन शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विक्री केला आहे हा कारखाना पवार यांचे निकटवर्तीय आसलेल्या सचिन शींगारे आयन शुगरचे संचालक आहे.

आता ईडी आर्थात  अंमलबजावणी संचालनालयने या कारखान्याचा चौकशीसाठी सर्व व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेतली आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री आजित पवार यांच्या निकटवर्ती आसलेल्या व्यक्तीची यात चौकशी होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –