राज्य सरकारने घेतला डिंभे धरणाबाबत एक महत्वाचा निर्णय

डिंभे धरण

पुणे : जलसंपदामंत्री जयंत पाटील व कामगार उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत डिंभे धरणाबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे आंबेगाव तालुक्यातील १९ गावांना कमळजाई उपसा सिंचन या योजनांद्वारे डिंभे धरणातून शेतीला पाणी उपलब्ध करून देणे. हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तालुक्यातील आदिवासी भागात असलेला पाणी प्रश्न सोडविण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. डिंभे धरणाच्या कमळजाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी तब्बल ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे १९ गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. तसेच त्यामुळे शेतीसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे.

निरोगी राहण्यासाठी प्लास्टिकऐवजी वापरा ‘या’ इको फ्रेंडली बॉटल्स

या बैठकीत हा निधी मंजूर झाला आहे. सर्वेक्षणाचे आदेश हे जयंत पाटील यांनी दिले. त्यासंदर्भात नुकतीच मुंबई येथे रविवारी (ता. ९) बैठक झाली.  तसेच सद्या डिंभे धरणात साडेतेरा टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी आदिवाशी धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी सहा टक्के पाणीसाठा हा आरक्षित आहे.

जलसंवर्धनाच्या कामात नागरिकांनी सहभागी व्हावे – राज्यपाल

राज्यसरकारच्या या निर्णयामुळे राजेवाडी, पोखरी, चिखली, जांभोरी, मेघोली, तळेघर, फलोदे, राजपूर, म्हातारबाची वाडी, नांदूरकिचीवाडी, तेरूंगण, निगडाळे, गोहे खुर्द, कोंढवळ, कोलतावडे, कळंबई, गोहे बुद्रुक, बोरघर, फुलवडे या गावांना पाणी मिळेल.

महत्वाच्या बातम्या –

नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

मराठवाड्याच्या सिंचन प्रश्नावर उपोषण म्हणजे ‘मगरीचे अश्रू’ – अनिल पटेल

पीएम किसान योजनेंतर्गत पीक कर्जासाठी विशेष मोहीम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती