शेतकऱ्यांच्या तीव्र भावना राज्य सरकारने केंद्रापर्यंत पोहोचवाव्यात – राजू शेट्टी

राजू शेट्टी

कोल्हापूर – केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला ८ दिवस पूर्ण झाले आहेत. केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या सत्राला सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत देखील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर अजूनही ठाण मांडून आहेत.

तर, आता महाराष्ट्रात देखील या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यांवर उतरताना दिसत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राज्यभरात आत्मक्लेश आंदोलन केलं गेलं. यावेळी अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून आलं. कोल्हापुरात स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी हे देखिलसहभागी झाले होते.

गुरुवारी रात्री सुरु करण्यात आलेलं आंदोलन आज पहाटे ६ पर्यंत करण्यात आलं

रात्रभर आत्मक्लेष जागरण गोंधळ आंदोलन करुन आम्ही संयम आणि शिस्त दाखवून दिली. हल्लाबोल कुठे आणि कधी करायचा हे देखील आम्हाला माहीत आहे, असा इशाराच शेट्टींनी यावेळी दिला. तर, ‘शेतकऱ्यांच्या तीव्र भावना राज्य सरकारने केंद्रापर्यंत पोहोचवाव्यात,’ अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुरस्कार वापसीच सत्र सुरु झालं आहे. महाराष्ट्रातील पुरस्कार विजेत्यांनी ही याचा बोध घेत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत हे केंद्र सरकारला दाखवून द्यावं, असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –